कल्याणच्या खडवलीतील शिवनिकेतन ट्रस्टच्या भारतीय सैनिकी विद्यालयातील घोड्याच्या अवघड ठिकाणी दिसणारी ती गाठ जखम असल्याचे प्रथम दर्शनी भासत होती. पण, त्या गाठीची तपासणी केल्यानंतर कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. या दरम्यान घोड्याच्या हालचालीत बदल आणि शिथिलता दिसून येत होती. मग या घोड्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी तीन किलो वजनाची गाठ बाहेर काढण्यात आली. सध्या घोडा निरीक्षणाखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पाच तास चालली.