सिंह राशीच्या जातकांचे 2016मधील संपूर्ण वार्षिक राशिभविष्यफल

मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (16:53 IST)
नवीन वर्षांत भाग्यवर्धक गुरूची तुम्हाला वर्षभर उत्तम साथ मिळणार आहे, परंतु चतुर्थस्थानामधील शनी आणि बराच काळ तेथेच राहणारा मंगळ या दोन ग्रहांचे चतुर्थस्थानामधले वास्तव्य त्रासदायक ठरणारे आहे. ऑगस्टपर्यंत निर्वेध प्रगती होईल. 2016 मध्ये सिंह राशीच्या व्यक्तिंना बहारदार फळे आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक बाजू योग्य मार्गावर राहील. 
पुढे वाचा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : तुमचा जोडीदार आणि तुमच्या निकटच्या इतरांसोबत तुमचं नातं उत्तम राहील. तुमच्या तब्येतीच्या अनुशंगानं, वजन वाढत असल्याचं दिसत आहे. ते नियंत्रणात ठेवून तुमचं शरीर रोगमुक्त राखण्यासाठी, अवजड आहार घेणं थांबवा. मद्यपानापासून दूर राहण्याने तुमच्या तब्येतीला मोठा फायदा होईल. 
 
कौटुंबिक आघाडीवर मात्र या वर्षांत तुम्हाला फारसे चांगले अनुभव येणार नाहीत. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान घरामध्ये एखादे शुभ कार्य पार पडेल. कुटुंबीयांसमवेत लांबचा प्रवास होण्याचे स्वप्न साकार होईल. जानेवारीपासून मार्चपर्यंत एखाद्या प्रश्नाची हळूहळू जाणीव व्हायला सुरुवात होईल. त्याकडे वेळीच लक्ष द्या. या दरम्यान जुने कौटुंबिक प्रश्न कोर्टव्यवहार आणि प्रॉपर्टीसंबंधी समस्यांना वेगळ्या ठिकाणी तोंड फुटेल. एकत्र कुटुंबपद्धतीत राहणाऱ्यांना वेगळ्या ठिकाणी जागा घ्यावीशी वाटेल. जुल ते सप्टेंबर डोकेदुखीचा काळ आहे. या दरम्यान नातेवाईकांशी ताटातूट होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरनंतर तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल.

2016 च्या भविष्यानुसार, प्रेम जीवनाचा आलेख वर चढत असल्याचं दिसतं. अविवाहितांचे यावर्षी विवाह यावर्षी जुळून येतील. तुमच्या लैंगिक जीवनाबाबत सांगायचं तर तुमच्या शारीरिक आकांक्षांची पूर्तता होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही उत्कट प्रसंगांचा आनंद घ्याल.
पुढे वाचा धंदा, व्यवसाय व नोकरी.... 

धंदा, व्यवसाय व नोकरी.... : तुम्हाला तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर सतर्क राहणे भाग पडेल, पण तुमची रास त्साही असल्यामुळे ही जबाबदारी निभावून नेऊ शकाल. व्यवसाय उद्योगात नवीन वर्षांच्या सुरुवातीला एखादा भव्य-दिव्य प्रोजेक्ट हाताळावासा वाटेल. आवश्यक ते भांडवल आणि इतर साधनसामुग्री 
याची जमवाजमव कराल. जानेवारी ते मार्च  दरम्यान तांत्रिक अडथळे आणि कामगारांचे प्रश्न हाताळावे लागतील. त्याकरिता पसे तयार ठेवा. 
 
एप्रिल ते जून या दरम्यान एखादे मोठे काम मार्गी लागेल. जुलपासून तुमचे उत्पन्न वाढल्यामुळे तुमच्यात एक नवीन ऊर्मी निर्माण होईल. अतिमहत्त्वाकांक्षा आवरा. अनोळख्या व्यक्तींशी जपून व्यवहार करा. आíथकदृष्टय़ा नवीन वर्ष चांगले जाईल. तुमच्या क्षेत्रात एखादे मोठे पद भूषवता येईल.
 
नोकरदार व्यक्तींच्या नेतृत्वगुणांना भरपूर वाव देणारे नवीन वर्ष आहे. मोठय़ा कामगिरीकरिता वरिष्ठांनी तुमची निवड केल्याने वर्षांची सुरुवातच धावपळीत होईल. जानेवारीत तुमच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याकरिता परदेशातसुद्धा जायला मिळेल. जानेवारी ते मार्च दरम्यान वरिष्ठ तुमच्यावर एखादे वेगळे काम सोपवतील. एप्रिलनंतर जूलैपर्यंत तुमचे ग्रह उच्चीचे आहेत. या दरम्यान तुमची एखादी खास मागणी वरिष्ठांकडून पूर्ण केली जाईल. पगारवाढ किंवा बढतीचे आश्वासन मिळाले असेल तर ते पूर्ण केले जाईल, पण काम खूप वाढेल.

जुलनंतरचा कालावधी कष्टदायक पण श्रेयस्कर ठरेल. तुमच्या आर्थिक जीवनाबाबत बोलायचं तर, हे वर्ष त्यासाठी देखील उत्तम दिसत आहे. तुमची संपत्ती वाढेल आणि त्याचसोबत तुमच्या बँक बॅलन्सही. तुमचा स्वतःचा व्यवसाय असो किंवा एखाद्या फर्ममध्ये नोकरी असो, नफा हमखास होणार. तुमच्या व्यवसायिक जीवनात नाव, पत आणि प्रशंसा वाढेल. 
 
तरुण मंडळींना खूप काम करून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावेसे वाटेल. सांसारिक जीवनात पदार्पण होईल. घरगुती कामांमुळे त्यांच्यावर काही मर्यादा येतील. कलाकार आणि खेळाडू त्यांच्या क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी करतील. त्याचे श्रेय त्यांना आíथक आणि इतर बाबतीत मिळेल. व्यक्तिगत जीवनात मात्र थोडासा तणाव राहील.

वेबदुनिया वर वाचा