नागा साधूंचे वेगळे जग, स्वत:चं करतात पिंडदान

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (14:44 IST)
कुंभच्या मेळाव्यात सर्वात अधिक आकर्षण असतं ते नागा साधूंचे. नागा साधूंचे जीवन इतर साधूंपेक्षा अधिक कठिण असतं. यांचा संबंध शैव परंपरेची स्थापनाने मानला गेला आहे. जाणून घ्या नागा साधू आणि त्यांच्या जीवनाबद्दल- 
 
13 आखाड्यांपासून तयार होतात नागा साधू
कुंभ मेळ्यात सामील होणारे 13 आखाड्यांपैकी सर्वात अधिक नागा साधू जुना आखाड्यांतून तयार केले जातात. नागा साधू बनण्याआधी त्यांना अनेक परीक्षेतून निघावं लागतं. ते आणि त्याचं कुटुंब तपासलं जातं. अनेक वर्ष आपल्या गुरुंची सेवा करावी लागते आणि आपल्या इच्छा त्याग कराव्या लागतात.
 
कसे बनतात नागा साधू 
इतिहासात नागा साधू यांचे असतित्व खूप जुने आहे. नागा साधू बनण्यासाठी महाकुंभ दरम्यान प्रक्रिया सुरू होते. यासाठी ब्रह्मचर्याची परीक्षा द्यावी लागते. यात 6 महिने ते 12 वर्ष इतका काळ लागतो. ब्रह्मचर्याची परीक्षा पास झाल्यावर व्यक्तीला महापुरुषाचा सन्मान दिला जातो. यासाठी पाच गुरु शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि गणेश निर्धारित केले गेले आहे. नंतर केस कापले जातात आणि कुंभ दरम्यान गंगा नदीत 108 वेळा डुबकी लावली लागते. 
 
महापुरुषानंतर असे बनतात अवधूत 
महापुरुष बनल्यानंतर त्यांच्या अवधूत बनण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यांना स्वत:चे श्राद्ध करून पिंडदान करावं लागतं. या दरम्यान साधू बनणार्‍या लोकांना पूर्ण 24 तास कपड्याविना अखाड्याच्या ध्वाजाखाली उभं राहावं लागतं. परीक्षेत यश मिळाल्यावरच त्यांना नागा साधू बनवलं जातं. 
 
नागा साधू बनण्यासाठी योग्य जागा
कुंभ मेळ्याचे आयोजन, हरिद्वारमध्ये गंगा, उज्जैनमध्ये क्षिप्रा, नाशिकमध्ये गोदावरी आणि अलाहाबादमध्ये गंगा-यमुना-सरस्वती संगम होतं, येथे चार पवित्र जागी नागा साधू बनतात. ही प्रक्रिया या चारी जागांवर होते. या चारी स्थानांवर अमृताचे थेंब पडले असल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजपर्यंत येथे कुंभ मेळ्याचे आयोजन होतात. 
 
नागा साधूंचे नावे
वेगवेगळ्या स्थानी नागा साधूची दीक्षा घेणार्‍या साधूंना वेगवेगळे नाव दिले जातात. अलाहाबाद, प्रयागराज येथे दीक्षा घेणार्‍यांना नागा म्हणतात. हरिद्वार येथे दीक्षा घेणार्‍यांना बर्फानी नागा 
म्हणतात तर उज्जैनमध्ये दीक्षा घेणार्‍यांना खूनी नागा म्हणतात. तर नाशिकमध्ये दीक्षा घेणार्‍यांना खिचडिया नागा म्हणतात. 
 
शरीरावर राख लावतात
नागा साधू बनल्यानंतर ते सर्व आपल्या शरीरावर एखाद्या मृत व्यक्तीची राख शुद्ध करून लावतात. मृत व्यक्तीची राख उपलब्ध नसल्यास हवनाची राख लावतात. 
 
जमिनीवर झोपतात 
नागा साधू गळ्यात व हातात रुद्राक्ष आणि फुलांची माळ धारण करतात. नागा साधूंना केवळ जमिनीवर झोपण्याची परवानगी आहे. म्हणून ते गादी वापरत नाही. नागा साधू बनल्यावर त्यांना प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन करावं लागतं. यांचे जीवन म्हणजे गूढ. कुंभ मेळ्यानंतर हे लुप्त होऊन जाता. नागा साधू जंगलात रात्री प्रवास करतात असेही म्हटलं जातं परंतू हे कोणालाही दिसत नाही. नागा साधू वेळोवेळी आपली जागा बदलत असतात. याच कारणामुळे यांची स्थिती माहिती करणे सोपे नाही. हे गुप्त स्थानावर राहून तप करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती