वर्ष 2016 भारतासाठी प्रगतीचे वर्ष

बुधवार, 30 डिसेंबर 2015 (15:21 IST)
नववर्ष 2016 भारतासाठी प्रगतीचे वर्ष ठरणार आहे. 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी सूर्योदयावेळी दिल्लीत धनू लग्न व सिंह नवांश, कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र राहणार आहे. या वर्षी व्यापारिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण संबंधांवर विचारपूर्ण करार होतील.
 
सूर्याची राशी सिंह मध्ये राशी परिवर्तन राजयोग भारतच्या प्रगतीत सहाय्यक राहील. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची उज्ज्वल प्रतिमा तयार होईल.
 
भारताच्या मुख्य नेत्यांना परराष्ट्र धोरणात शत्रू मंगळाची राशी वृश्चिकामध्ये शनी षष्टेश, लाभेश, शुक्रासोबत वाणी व पराक्रमेश होऊन उपस्थित असल्यामुळे परराष्ट्र व्यवहारात आणि आर्थिक बाबतीत खबरदारी घ्यायला हवी.
 
चतुर्थ भावामध्ये एकमेव केतू अपघाताची सूचना देत आहे म्हणूनच सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नको. दशम भावामध्ये अष्टमेश चंद्रासह राहू असल्याने राजकारणी नेत्यांची काळजी वाढू शकते. या वर्षी शत्रू पक्षावर प्रभाव सोडण्यात सक्षम असाल.
 
भारतीय धनकोषात वृद्धीची शक्यता आहे. सरकार शिक्षण क्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. सध्यातरी सामान्य लोकांचे कष्ट कमी होण्याची शक्यता कमीचं आहे. एकूण भारतासाठी हे वर्ष प्रगती देणारे ठरेल. 

वेबदुनिया वर वाचा