कन्या राशीच्या जातकांचे 2016 मधील संपूर्ण वार्षिक राशिभविष्यफल

बुधवार, 30 डिसेंबर 2015 (16:28 IST)
या वर्षी दुर्दैवाने, तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला अपेक्षित अशा निकट नात्याचा आनंद आपल्याला मिळणार नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत देखील खटके उडण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत, तुमच्या अपेक्षा खूप अधिक ठेवू नका. या महिन्यानंतरच तुम्हाला चांगले अनुभव येतील. परंतु, तुम्ही नोकरीत असाल तर, तुम्हाला मोठ्या समस्या भेडसावणार नाहीत. तुमच्या प्रेम जीवनातील शक्यतांचा विचार करता ते जबरदस्त आणि सुरळित राहील असे दिसते. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकलात तर त्याहून उत्तम गोष्ट नसेल.
 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : मनापासून इच्छा असूनही येत्या वर्षांत तुम्ही घराकरिता किती वेळ काढू शकाल याची शंका वाटते. जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान नवीन जागेचे बुकिंग, वाहन खरेदी किंवा इतर काही कार्यक्रमांमुळे तुम्हाला बरेच पसे लागतील.  जानेवारी ते मार्च हा कालावधी तुमची इच्छा-आकांक्षा वाढविणारा आहे. घरामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. 
 
एप्रिल ते जुल या कालावधीमध्ये एखादा कौटुंबिक सोहळा होईल. तुम्हाला लांबचा प्रवास करावासा वाटेल. जुलनंतर पुढील दिवाळीपर्यंत एखादी मोठी इच्छा-आकांक्षा साकार झाल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. 
 
तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूचा तुम्हाला त्रास होईल असं दिसतं, कारण तब्येत देखील बिघडण्याचे संकेत आहेत. तुमचे आरोग्य तुमच्या हाती आहे; तुम्ही ते जितक्या गंभीरपणे घ्याल, तितकं ते चांगलं राहील. पैशांच्या बाबतीत तोटा होणे शक्य आहे. गुरू बाराव्या स्थानात राहण्याने तुम्हाला समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च या दरम्यान इतरांना न जमलेले आणि जिकिरीचे काम वरिष्ठ तुमच्या गळ्यात मारतील. त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल, मात्र यश मिळविण्यासाठी प्रकृतीची साथ आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. मे-जुलै हा कालावधी तुम्हाला श्रेय देणारा ठरेल.
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : नवीन वर्षांत शनी आणि मंगळ यांच्यासारखे महत्त्वाचे ग्रह तुमच्या साथीला आहेत. इतर ग्रहसुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहणार आहेत. त्यामुळे तुमच्या व्यवहारी स्वभावाला अनुसरून अनेक गोष्टी तुम्ही करू शकाल. त्याचा अभिमान तुमच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येईल. मात्र जुलपर्यंत गुरूची साथ नसल्यामुळे प्रगतीमध्ये थोडेफार अडथळे असतील.
 
व्यापार उद्योगात नवीन वर्षांच्या सुरुवातीला तुमचे काम आणि उत्पन्न समाधानकारक असेल. तरीही जानेवारीपर्यंत तुमची अभिलाषा वाढतच राहील. जानेवारी ते मार्च या दरम्यान नवीन कार्यपद्धतीला सुरुवात होईल. त्यासाठी बरीच मोठी गुंतवणूक करावी लागेल. एप्रिलपासून पुढे तुमची घोडदौड चालू होईल. जूनपर्यंत एखादे मोठे काम पूर्ण केल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. जुल ते सप्टेंबर या दरम्यान नवीन करार करताना किंवा लांबचा प्रवास करताना जास्त धोका पत्करू नका. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील संभाव्य धोक्यांचा अंदाज घ्या. सप्टेंबरपासून तुमच्या इच्छा-आकांक्षा सफल होतील.
 
नोकरदार व्यक्तींना नवीन वर्ष म्हणजे यशाची नवीन पर्वणी आहे. चांगले काम हातात असल्यामुळे भरपूर काम करण्याची इच्छा असेल. जानेवारीपर्यंत सतत दगदग आणि धावपळ असेल, पण केलेल्या कामाचा भरपूर आनंद मिळेल. काहींची एखाद्या प्रोजेक्टनिमित्त परदेशात जाण्याकरिता निवड होईल. जुल ते पुढील दिवाळी या दरम्यान खऱ्या अर्थाने तुम्हाला केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल.
 
तरुणांना जुलनंतरचा कालावधी उत्तम आहे. त्या वेळी त्यांना पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण येईल. तरुणांचे दोनाचे चार होतील. कलाकार आणि खेळाडूंनी वर्षभर कष्टाची तयारी ठेवावी. त्याचे त्यांना निश्चित चांगले फळ मिळेल. पुढील दिवाळीपर्यंत व्यावसायिक स्थिरता लाभून वैवाहिक जीवनात पदार्पण करता येईल.

वेबदुनिया वर वाचा