आरती रामाची - जयजयाजी रामराया करि कृपेच छाया

रविवार, 10 एप्रिल 2022 (07:48 IST)
जयजयाजी रामराया करि कृपेची छाया ।
पंचारति ओवाळुनि करूं कुरवंडी पाया ॥धृ॥
ब्रह्मयाच्या वरदानें दैत्य रावणकुंभकर्ण ।
अजिंक होवुनिया देव पीडिले संपूर्ण ।
दितिकुळ तृप्त जालें भक्षुनिया ऋषिगण ॥१॥
भूभार हारावया रघुकुळीं अवतार ।
कौसल्येचे ठाईं जालें परब्रह्म साकार ।
दाशरथि रामचंद्र मूर्तिं सावळि सुंदर ।
देव पुष्पवृष्टि करिति अयोध्येसि जयजयकार ॥२॥
शेष सेवा करावया जाला बंधु लक्षुमण ।
ताटिकेसी मारियलें केलें मखाचें रक्षण ।
शिवचाप भंगोनिया वरिली सीता सुलक्षण ।
भार्गवाचा गर्व हरिला येतां अयुध्येलागुन ॥३॥
पितृआज्ञे वनवास देवकार्यार्थ केला ।
सुग्रिवादि वानरांचा समुदाय मेळविला ।
पाण्यावरि दगडाचा दृढसेतु बांधिला ।
रावणातें दंडुनिया सीताशोक निवारिला ॥४॥
पुष्पकविमानांत सीतारामलक्षुमण ।
नळनीळ जांबुवंत सुग्रिव भक्त हनुमान ।
अयोध्येसि येते जाले भरतासि संबोखुन ।
रघुराज गुरुपायीं ठेवि मस्तक निरंजन ॥५॥
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती