मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे. राज्य सरकारला दिलेली मुदत संपत आली असून मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने जाणार आहे. मनोज जरांगे पाटील हे सहा ठिकाणी मुक्काम घेणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी काही मराठा समन्वयकांनी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. ही व्हॅन अत्याधुनिक सुविधा असणारी असून या व्हॅन मध्ये वॉशरूम, एसी,बाथरूम, छोटा फ्रिज, टीव्ही, मायक्रोव्हेन देखील आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार कडे आरक्षण मिळण्याच्या मागण्या केल्या ज्यांना राज्य सरकारने पूर्ण नाहीकेले. राज्य सरकारला दिलेली मुदत आज संपत असून उद्या 20 जानेवारी रोजी जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पायी जाणार आहे. काल सरकारच्या शिष्ट मंडळ आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली असून ती फिस्कटली. यावर आता मनोज जरांगे हे मुंबईला जाणार असल्याचे ठाम आहे.