संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारवरच आरोप केले आहेत. मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काही मंत्र्यांनाही फूस लावली जात आहे. काही मराठा नेत्यांनाही बळ दिलं जात आहे. मध्यरात्रीच्या बैठका घेतल्या गेल्या आहेत. माझ्या विरोधात मोठा डाव सुरू आहे, असा गंभीर आणि सनसनाटी आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
रॅलीत लोकं घुसवण्याचा प्लान
चर्चा सर्वच केली. ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या घरातील किती लोकांना प्रमाणपत्र दिलं हे विचारलं. केवळ 54 लाख नोंदी सापडल्या एवढं नको, प्रमाणपत्र दिलं का ते सांगितलं पाहिजे. सोयरे शब्द त्यात घेतला असता तर ही वेळच आली नसती. आम्हा सर्वांना आरक्षण हवं आहे. सरकार सर्व डाव टाकण्याच्या तयारीत आहे. माझ्यावर डाव टाकला जाणार आहे.
मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मीही माहिती घेत आहे. माझ्यावर ट्रॅप लावण्याचीही शक्यता आहे. मी जबाबदारीने सांगत आहे. मला शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या रॅलीत कुणाला तरी घुसवायचा प्लान सुरू आहे. त्यांचेच लोकं आणि अधिकारी आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे मराठा समाज सावध आहे, असा दावा जरांगे यांनी केला.