मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजपासून सुरु होणार आहे. २५ जानेवारी ही तारीख आधी निश्चित करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण आजच लिस्ट झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला होता. मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी विविध उदाहरणे देऊन स्थगिती हटविण्याची विनंती केली होती. मात्र, त्याला कोर्टाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि पुढील सुनावणीसाठी २५ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टात हे प्रकरण बुधवारी म्हणजेच २० जानेवारीला लिस्ट झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील सुनावणी आजपासून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे.