सध्या मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मनोज जरांगे पाटील हे सभा घेत आहे. मराठा आरक्षणची मागणी घेत आंदोलन केले जात आहे. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणावर चर्चा झाली. राज्य सरकारला 24 डिसेंबरचे अल्टिमेटम दिले असून उद्या त्याची मुदत संपत आहे. बीड येथे मनोज जरांगे हे मोठी सभा घेणार आहे. यासाठी तयारी सुरु आहे. त्या पूर्वी बीड मध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीने मराठा आरक्षणाची मागणी घेत आपले आयुष्य संपविले आहे.
बीडच्या बार्शीनाका परिसरात शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी रात्री सदर घटना घडली असून मधुकर खंडेराव शिंगण असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या इसमाने एक चिट्ठी लिहिली आहे त्यात त्याने मी मराठा आरक्षणासाठी आपले आयुष्य संपवत असल्याचे लिहून दिले आहे. त्याने लिहिले की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढत असून ते चांगले काम करत आहे. त्यांनी माझ्या मृत्यू नंतर माझ्या कुटुंबीयांची भेट द्यावी.