मराठा आरक्षण : माझ्या समाजाचे नेते माझ्या सोबत नाही, मी एकटा लढत आहे -मनोज जरांगे पाटील

मंगळवार, 25 जून 2024 (19:00 IST)
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज झाले. या पूर्वी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. जरांगे हे 8 जून पासून उपोषणाला बसले आहे. त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
जरांगे मराठा समाजाच्या बांधवाना मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा या साठी कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी कार्यकर्त्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक विरोध करत आहे. ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार कोणताही निर्णय राज्य सरकार ने घेऊ नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. ओबीसी कार्यकर्त्यांसह ओबीसींचे काही नेते देखील आहे.लक्ष्मण हाके यांची चर्चा राज्य सरकारशी झाल्यावर हाके यांनी आपले आंदोलन मागे घेतले. हाके यांच्या सोबतीला ओबीसी चे विरोधी पक्षाचे नेते एकत्र आहे. 

मनोज जरांगे म्हणाले, मी मराठा आरक्षणासाठी एकटा लढत असून माझ्या सोबत माझ्याच समाजाचे नेते नाही. त्यातील काही जण बाजूला झाले असून मी एकटा आहे. तरी मी लढत राहणार. राज्य सरकारने मराठा समाजच्या मागण्या पूर्ण कराव्या असे आवाहन त्यांनी केले. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती