मराठा आरक्षण: अंतरिम आदेशाला पुढील आठवड्यात आव्हान दिले जाणार

शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (08:36 IST)
मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशाला पुढील आठवड्यात आव्हान दिले जाईल. तसेच या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला दिलासा देण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्याचे सूतोवाच स्वतः मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यानुसार पुढील निर्णय लवकरच जाहीर होतील, असे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. नांदेडमध्ये ते बोलत होते. 
 
मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढणे, सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या खंडपीठाकडे जाऊन फेरविचार याचिका करणे, घटनापीठाकडे जाऊन आदेश निरस्त करण्याची विनंती करणे, मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणे, विविध अभ्यासक्रमांच्या जागा वाढवणे असे अनेक पर्याय, सूचना समोर आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती