जरांगे-पाटील उपोषणावर ठाम, शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन

शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (07:57 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे.यामध्ये नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबीचं जातप्रमाणपत्र मिळणार आहे.जीआर सोबतच उपोषण मागे घेण्यासाठी जरांगेंना विनंती पत्र पाठवण्यात आले. जीआरची प्रत घेवून खोतकर यांनी जरांगेंची भेट घेतली.यावेळी जरांगेनी सरकारच्या जीआरच स्वागत केलं.अर्जुन खोतकरांनी जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी खोतकरांनी जीआर वाचून दाखवला.जीआरमध्ये सुधारणा सुचवायची असेल तर जरांगेंनी मुंबईत यावं किंवा जरांगेंना शक्य नसल्यास शिष्टमंडळ मुंबईत पाठवावं, असे निमंत्रण देण्यात आलं.जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्टचं सांगितलं. जीआर मधील सुधारणा सांगण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्यात येईल असेही ते म्हणाले.
 
सर्वांनी शांततेत आंदोलन करा-जरांगे-पाटील
आंदोलन शांततेत सुरु आहे.पाठिंबा द्या, पण लोकशाहीने द्या.आंदोलनाला गालबोट लागेल असं काही करू नका,वेगळा प्रयोग करू नका, स्वतःच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य करू नका, असे आवाहन त्यांनी केलं. समाजाला न्याय मिळण्यासाठी लोकशाही पध्दतीने आंदोलन करा. जो वेगळा पर्याय निवडेल त्याला आमचे समर्थन नसल्याचे स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती