काँग्रेसने शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी काही अटी ठेवल्या

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (16:06 IST)
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. काँग्रेसने शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी काही अटी ठेवल्याची माहिती आहे. त्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यावतीने समन्वय समिती तयार करावी, अशी आहे. 
 
काँग्रेसच्या अटीनुसार एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनविण्यात यावा, दुसरी अट म्हणजे ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नको आणि समन्वय समितीचे गठन करण्याच्या अटी काँग्रेसने ठेवल्या आहेत. त्यासोबतच, 4 आमदारांच्या पाठीमागे 1 मंत्रीपद असंही समिकरण काँग्रेसला इच्छुक असल्याचं समजते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती