मनसेचा गढ असलेल्या नाशिक, पुणे सह लढवणार राज्यात १२२ जागा

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (09:43 IST)
शेवटी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मनसेने  थेट उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून, मनसेने 100 पेक्षा जास्त उमेदवारांची तयारी जाणून घेतली. इतकंच नाही तर मुंबई, ठाणे, नाशिकमधील सर्व जागा मनसे लढवणार आहे. मनसेची राज्यात एकूण 122 जागा लढवणार आहे. त्यामध्ये मुंबईतील 36 पैकी 36 जागा, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मराठवाडा 42 पैकी 22, विदर्भ 62 पैकी 15, कोकण 15 पैकी 10, उत्तर महाराष्ट्र – चाचपणी सुरु, अशी मनसेने तयारी केली आहे.
 
तर दुसरीकडे शिवसेना-भाजपची युती जर झाली तर अनेक नाराज मनसेकडे येतील असे पक्षाला वाटते त्यामुळे युती होईल असं गृहीत धरुन मनसे नाराजांना संपर्क करत आहे. भाजपा आणि सेनेचे काही पदाधिकारी मनसेच्या वाटेवर असल्याचा दावा मनसेचा आहे. त्यामुळे मनसे जिंकून येऊ न येवो मात्र मनसे अनेक ठिकाणी विक्रमी मते नक्की मिळवणार हे राजकीय विश्लेषकांना वाटते, त्यामुळे राज ठाकरे यांना अडवण्याचे इतर पक्षातून आता प्रयत्न सुरु होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती