सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई - पुणे व नाशिक पुणे इलेक्ट्रीक बससेवा

गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (10:03 IST)
सप्टेंबर २०१९  पासून मुंबई-पुणे आणि नाशिक-पुणे या मार्गावर इलेक्ट्रीक बस धावणार आहेत. या प्रकल्पसाठी दोनशे बसेससाठी निविदा काढण्यात आलेली आहे. ही सेवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक ते पुणे  या मार्गावर सर्वात प्रथम सुरु होणार आहे. त्यासाठी या दोन्ही जिल्ह्या दरम्यान  इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एसटी महामंडळाकडून निविदा प्रक्रिया लवकरच  राबविण्यात येणार आहे.
 
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून  सुविधा राबविण्यात येणार आहे. यातील समाविष्ट असलेल्या बसेस या एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे २५० किलोमीटर धावू शकतील.
 
यासाठी महामंडळाने नाशिक पुणे मार्गावर बस चालू करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान हा प्रकल्प खाजगी कंपनी सुरु करणार असून, आगोदर या मार्गावर बसची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी पूर्ण होताच इलेक्ट्रीक बस नाशिक, मुंबई आणि पुणेनंतर इतर आंतरजिल्हा मार्गावरही धावू शकतील, असे मत महामंडळाने स्पष्ट केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती