नरेंद्र मोदी नाशिक सभा : राज्यावर पाच वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही - मुख्यमंत्री

गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (14:55 IST)
भाजपची महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा नाशिकमध्ये होत आहे. नाशिकमधील तपोवनमधील साधुग्राम मैदानावर ही सभा सुरू आहे.
 
2.14 - नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात
- नरेंद्र मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.
 
- छत्रपती उदयनराजेंनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवलंय, हा सन्मान आहे आणि ही जबाबदारीसुद्धा आहे. त्याची इज्जत ठेवण्यासाठी मी माझं जीवन पणाला लावेल यासाठी मला आशिर्वाद द्या.
 
- जे यात्रेला जाऊन येतात त्याला नमस्कार केल्यास त्याला अर्धं पुण्य मिळतं. मी पण इथे देवेंद्रजींसारख्या यात्रीला नमस्कार करायला आलो आहे. 4000 किमीच्या या यात्रेत त्यांना आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. अध्यात्मिक आणि सामर्थ्याच्या चेतना त्यंनी जागविल्या आहेत.
 
- जिथे जिथे माझी नजर जातेय तिथे तिथे लोक उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला आशीर्वाद देण्यासाठी जनसागर लोटलाय.
 
- मी महाराष्ट्रातील विद्वानांना आवाहन करतो, की ते तत्कालिन घटनांवर लिहितातच. पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर लिहायला हवं.
 
- या महाराष्ठ्रात कुणी मुख्यमंत्री, कुणी सरकार सलग पाच वर्षं चालवल आहे तर ते एक वसंतराव आणि दुसरे देवेंद्र फडणवीस आहेत. दोनच उदाहरणं आहेत.
 
- आता पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या स्थिर सरकारचा फायदा जनतेने उठवला पाहिजे.
 
- पूर्ण बहुमत नसताना देवेंद्रजींनी 5 वर्षं यशस्वी सरकार चालवलं.
 
- राजकारणातल्या विद्वानांना कळत नाही, पण जनतेप्रती समर्पण केल्याचा फायदा देवेंद्रजींना मिळालाय. मलाही मिळाला होता. राजकारणी विद्वानांना ते कळणार नाही.

- साठ वर्षांत पहिल्यांदा एक सरकार दुसऱ्यांदा दुप्पट ताकदीने पुन्हा सत्तेत आलं. जनता ताकद देते तेव्हा सरकारलाही ताकदीने काम करता येते. 100 दिवसांत याची प्रचिती पाहिली का? ही तुमचीच ताकद आहे.
 
- महाराष्ट्रात लोकांमध्ये जाऊन पाच वर्षांच्या कार्याचा हिशोब दिला. देवेंद्रजींनी रिपोर्ट दिला. महाराष्ट्राला सामाजिक स्थिरता मिळाली, सद्भाव मिळाला. आधुनिक इ्न्फ्रास्ट्रक्चर मिळालंं.
 
- महाराष्ट्रातील बहिणाींना मुद्राऋण आणि रोजगार योजनांतून संधी मिळाली. बंजारा जातीच्या आवाज ऐकला गेला.
 
- हे रिपोर्टकार्ड फक्त पाच वर्षांमध्ये मिळालंय असं नाही. भाजपचं सरकार नेहमीच आपल्या कार्याचा हिशोब देतं.
 
- देशाच्या विकासाची गती वाढेल.
 
- आम्ही महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ आम्ही देऊ, 20 हजार करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत.
 
- घराघरात पाणी पोहोचवू म्हटलं होतं, त्याच्यावर काम सुरू आहे.
 
- देशातल्या 500 कोटींपेक्षा जास्त पशुधनाला संसर्गापासून वाचवण्यासाठी लसिकरण काम सुरू आहे.
 
- देशाच्या लष्कराला सशक्त करण्यासाठी आवश्यक प्रत्येक पाऊल उलंले. तिन्ही लष्करी दलांमधल्या योग्य ताळमेळासाठी दशकांपसून चर्चा सुरू होती. पण आम्ही त्यासाठी पद निर्माण केलं.
 
- 2009 मध्ये 1 लाख 76 हजार बुलेटफूट जॅकेट लष्करानं मागितले होते. त्याशिवाय जवान लढत होते. भाजप सरकार आल्यावर आम्ही बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीची परक्रिया सुरु केली. शिवाय त्यांची निर्मिती नाशिकमध्ये सुरू केली. आता त्याची निर्यातही करत आहोत.
 
- आम्ही महारा्ष्ट्राबरोबरच देशाला वचन दिलं होतं जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या अडचणींसाठी प्रयत्न करू. आज आम्ही ते स्वप्न पूर्ण करण्यासााठी पाऊल टाकलेलं आहे. हा केवळ सरकारचा निर्णय नाहीये तर 130 कोटी भारतीयांचा निर्णय आहे.
 
- आता घोषणा द्यायच्यात - 'हमें हिंदुस्थानिओंको नया कश्मीर बनाना है.. वहा फिरसे एक बार स्वर्ग बनाना है', चला, काश्मीरच्या जखमांवर मलम लावू या.
 
- दिल्लीच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरला त्रास झालाय, ते बदलायचंय. तिथले तरुण, माता भगिनी या हिंसेतून बाहेर पडण्यासाठी मनाने तयार झाले आहेत.
 
1.55 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
 
जय भवानीचा जय शिवाजीचा जयघोष करून मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली.
 
- मोदींनी माझ्यासारख्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये न बसणाऱ्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदी सं दिली.
 
- पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही.
 
- आपलं दैवत महाराष्ट्राची 12 कोटी जनता आहे. काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना विसरली. म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं.
 
- मला सगळीकडे लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वाद दिला.
 
- मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागातून मला कोल्हापूर पूरग्रस्त भागासाठी लोकांनी मला साडेतीन कोटी रुपयांचे चेक दिले. महाराष्ट्रातल्या जनतेचे कसे आभार मानू.
 
- पवार म्हणाले, मुख्यमंत्री हिशोब देतायंत. आमच्याकडे तपासनीस ठेवतो. पण आम्ही सेवक आहोत. आम्ही जनतेत जाऊन हिशोब देतो. म्हणून लोकांनी सेवकांना निवडून दिलं. राजेशाही लोकांना दिलं नाही.
 
- मागच्या निवडणूक आणि आताच्या निवडणुकीतील फरक शिवरायाचां आशीर्वाद, मोदीजी आणि आता राजांच्या वंशजाची साथ आहे.
- पुढच्या पाच दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचाय.
 
- मराठवाड्यात पाणी आणायचाय. योजनांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पाणी आणू.
 
- देशाच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नात 1 ट्रिलियन महाराष्ट्राचा वाटा असेल.
 
- उद्योगक्षेत्रातल्या 89 लाख लोकांना रोजगार गेल्या पाच वर्षांत आम्ही दिला.
 
1. 40 - नरेंद्र मोदींचे पगडी घालून स्वागत
 
उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पगडी घालून स्वागत केलं.
 
1.37 - नरेंद्र मोदींचं व्यासपीठावर आगमन
 
1. 35 - तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बंधन, करतो शिवाजी महाराज आणि बाबासाहेंबांना वंदन,
 
महाराष्ट्रात जनादेश यात्रेचं फडणवीसांनी आणलं चंदन, मोदी करणार आहेत विरोधकांचं रणकंदन - रामदास आठवले यांनी आपली कविता सादर केली.
 
1.34 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचं आगमन
 
1. 29 - भाजप हा जातीपातीला थारा देणारा पक्ष नाही - पंकजा मुंडे
 
1.28 - राज्याला राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त करण्याचं स्वप्न - पंकजा मुंडे
 
याआधी काय घडलं?
गेले काही दिवस महाजनादेश यात्रेनिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून प्रवास केला आहे. या दरम्यान अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेशही केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, आगामी काळातील सरकारचे धोरण, बेरोजगारी आणि पक्षामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांचा वाढता प्रवाह याबद्दलही नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कांद्यावरील निर्यातबंदी आणि बाहेरून कांदा आयात करण्याच्या विचारामुळे कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधान काय करतात याकडेही नाशिकच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 
या सभेच्या आणि कांद्याच्या कोंडीमुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहोचू नये यासाठी आज सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
 
गेली पाच वर्षं महाराष्ट्रात सत्तेत राहिलेले शिवसेना आणि भाजप युती करून आगामी निवडणुकांना सामोरं जाणार की स्वबळाचा नारा देणार, हे अद्याप निश्चित नाही. मात्र युतीतला तणाव वाढवणारी लक्षणं ठळकपणे दिसू लागली आहेत. अशा स्थितीत महाजनादेश यात्रेच्या अंतिम दिवशी काही संकेत मिळतील अशीही चर्चा सुरू आहे.
 
2014 साली मे महिन्यात केंद्रात सत्तांतर झाल्यावर काही महिन्यातच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले होते. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपचे तेव्हाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अख्खा देश पिंजून काढला होता. त्यानंतर या राज्यांच्या विधानसभांसाठीही त्यांनी सर्वत्र प्रचार केला होता.
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत नव्याने पंतप्रधानपदी आलेल्या नरेंद्र मोदी यांची 'ब्रँड व्हॅल्यू' चांगलीच जाणवत होती. नरेंद्र मोदी यांनीच राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी केलेल्या प्रचाराचा फायदाही भाजपाला झाला होता. त्यामुळे यंदाही नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा भाजपाला किती फायदा होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती