राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभा उमेदवार छगन भुजबळ यांनी येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील संपत्तीचाही त्यांनी तपशील प्रतिज्ञापत्रात नमूद केला असून, याअगोदर भुजबळांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. मात्र तरीही सर्वाना कुतूहल आहे की भुजबळ यांची संपत्ती नेमकी आहे किती.
बँकातील ठेवी – चार बँकांमध्ये अनुक्रमे 12 लाख 66 हजार 56 रुपये, 2 लाख 9 हजार 378 रुपये, 2 लाख 9 हजार 381 रुपये आणि 2 लाख 9 हजार 380 रुपये, बँकेतील ठेवी – 46 लाख 20 हजार 787 (पत्नीकडे – दोन बँकांमध्ये अनुक्रमे – 5 लाख 89 हजार 470, 1 लाख 64 हजार 170)
बाँड्स, शेअर्स – 1 लाख 62 हजार 52 रुपये, पत्नीकडे 25 लाख 25 हजार 100 रुपये
सोने – 21 लाख 6 हजार रुपये