भाजपचे विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सकाळीच चंद्रशेख बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत यांना मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्याऐवजी बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना पक्षाने एबी फॉर्म देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जी बाब एकनाथ खडसेंच्या बाबतीच झाली, तीच बाब चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीत देखील घडल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपने उमेदवारांची शेवटची यादी सकाळी जाहीर केल्यानंतर प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि राज पुरोहित या दिग्गज नेत्यांना तिकीट नाकारल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं पाहायला मिळाली.