हृदयनाथ मंगेशकर शिवसेनेत

ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हृदयनाथ मंगेशकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत कलाकारांचे आगमन सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेने त्याला मुंबईतील माहीम येथून विधानसभेची उमेदवारी दिली. लता मंगेशकर आणि आशा भोसले याचे धाकटे बंधू असलेल्या हृदयनाथ मंगेशकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ घेतली.

वेबदुनिया वर वाचा