मतदारांसाठी आता 'नो वोटिंग'चा पर्याय

आपल्‍या मतदारसंघातील एकही उमेदवार मत देण्याच्‍या योग्येतेचा वाटत नसल्‍यास मतदारांना आता निवडणूक आयोगाने 'नो वोटिंग'चा पर्याय खुला केला आहे. सध्याच्या मतदान यंत्रांमध्ये हा पर्याय उपलब्ध नसल्याने अशा मतदारांना हा हक्क बजावण्‍यासाठी फॉर्म-१७-अ भरून द्यावा लागणार आहे.

निवडणूक नियमांपैकी नियम '४९-ओ' नुसार नो वोटिंगचा हक्क मतदारांना दिला असला तरी मतदान यंत्रांमध्ये असे बटन उपलब्ध नसल्याने तो कागदावरच बजावावा लागणार आहे. मतदान यंत्रांमध्ये 'नो वोटिंग नोंदविण्याची सोय उपलब्ध असावी व नकारात्मक मतदानही त्यात नोंदले जावे, यासाठीची याचिका न्यायालयात याआधीच दाखलही करण्यात आलेली आहे.

यामुळे भविष्यात केव्हातरी मतदान यंत्रांमध्ये नो वोटिंगची तरतूद करणारी कळ किंवा बटन मतदारांसाठी उपलब्ध होऊ शकेल. अर्थात, तरीही अशा मतदारांना मतदान केंद्रांवर जावेच लागेल, ही गोष्ट वेगळी! महत्वाची गोष्ट म्हणजे, नो-वोटिंग करणार्‍यांमध्ये सर्वच वयोगटातील मतदारांचा समावेश असला तरी युवा वर्गाची संख्या यात खूप मोठी आहे.

वेबदुनिया वर वाचा