बॉलीवूडकर मंडळीही मतदानासाठी पुढे

भाषा

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2009 (17:13 IST)
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात बॉलीवूडकर मंडळींनीही हिरीरीने पुढाकार घेतला आहे. अभिनेता जॉन अब्राहम, गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी आज सकाळीच मतदान करून मतदानाप्रती जागरूकता दाखवून दिली.

जॉनने वांद्रे येथे, अख्तर दाम्पत्याने जुहूमध्ये मतदान केले. मतदान हेच बदलाचे साधन आहे, असे सांगून त्याचा वापर केला पाहिजे, असे मत जॉनने व्यक्त केले. घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडण्याचा आणि आपले सरकार कोणते असावे हे ठरविण्याचा हक्क दिला आहे, याबद्दल आपण या घटनेचे आभारी असले पाहिजे, असे मत अख्तर यांनी व्यक्त केले. शबाना आझमी यांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला.

वेबदुनिया वर वाचा