मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नसल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी सांगितले. अपघातामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था काही काळासाठी विस्कळीत झाली. पोलिसांनी सांगितले की, कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील रानवल चौकात सकाळी 10.13 वाजता नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसला आग लागली. चालकाला हे लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ थांबवली. पोलिस उपायुक्त म्हणाले की, पोलिसांनी पाण्याच्या टँकरच्या मदतीने काही मिनिटांत आग विझवली.