मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री ए सत्य प्रसाद म्हणाले की, मृत भाविकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंत्री गटाच्या भेटीचा भाग म्हणून पीडित कुटुंबांना भेटल्यानंतर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांची घोषणा केली आहे. तसेच ते म्हणाले की, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू लवकरच येतील आणि सर्व जखमींशी बोलतील आणि त्यानंतर जखमींना किती नुकसानभरपाई द्यायची याचा निर्णय घेतील. असे सांगितले जात आहे की शेकडो भाविक भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आले होते. वैकुंठ द्वार दर्शनमसाठी तिरुमला टेकड्यांवर तिकिटांसाठी ते धावपळ करत होते. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या वैकुंठ द्वार दर्शनमसाठी देशभरातून शेकडो भाविक आले आहे.