अक्कलकोटमध्ये भाजपच्या सभेत गोळीबार, 1 ठार

राज्‍य विधानसभा निवडणुकीत आता उत्तर प्रदेश आणि बिहार सारखी अवस्‍था निर्माण होत चालली असून शनिवारी सोलापूरजवळील अक्कलकोट येथे भाजपच्या सभेत गोळीबार झाला असून त्‍यात एक जण ठार तर तिघे जखमी झाल्‍याची घटना शनिवारी घडली आहे. भाजप नेते सिद्रामप्पा पाटील यांच्या सभेत हा गोळीबार झाला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव भिमण्णा कोरे असे आहे.

राज्यमंत्री सिद्धराम मेहेत्रे यांचा मतदार संघ असलेल्‍या अक्कलकोटमध्‍ये भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांची सभा सुरू असताना हा प्रकार घडला. हा गोळीबार सिद्धराम मेहेत्रे यांनी घडवून आणल्‍याचा आरोप सिद्रामप्‍पा पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपातर्फे अक्कलकोटमध्ये रविवारी गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात येणार असून तर सिद्धराम म्हेत्रे यांना अटक झाल्याशिवाय मृत कार्यकर्त्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा भाजपने घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा