Israel-Hamas War: इस्रायलने गाझामध्ये केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत हा हल्ला केला. गुरुवारी सकाळी झालेल्या या हल्ल्यात हमासचा एक दहशतवादीही मारला गेला.
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत हमासवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने घोषित केलेले सुरक्षा अधिकारी आणि मानवतावादी झोन यांना लक्ष्य केल्याचे हमासने म्हटले आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गुरुवारी गाझा पट्टीत 26 जण ठार झाले. तसेच पहाटे झालेल्या हल्ल्यात किमान 10 जण ठार झाले. त्यानंतरही हल्ले सुरूच होते. अशा प्रकारे दिवसभरात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी गुरुवारी सकाळी इस्रायली लष्कराने हमासचा दहशतवादीलाही हवाई हल्ल्यात ठार केले होते.