गेल्या मंगळवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यानंतर आताअफगाणिस्ताननेही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. या पलटवाराची माहिती तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या हल्ल्यात 19 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे, तर तीन अफगाण नागरिकही ठार झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या अनेक भागात हा हल्ला केला आहे.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की गेल्या आठवड्यात देशावर प्राणघातक हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या सैन्याने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हल्ले केले. खरं तर, मंगळवारी पाकिस्तानने बंडखोरांविरुद्ध मोहीम सुरू केली होती आणि अफगाणिस्तानच्या पूर्व पक्तिका प्रांतातील प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक लोक मारले गेले, ज्यात महिला आणि लहान मुले आहेत.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी 'X' वर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, त्यांच्या सैन्याने पाकिस्तानमधील त्या ठिकाणांना लक्ष्य केले ज्याचा वापर अफगाणिस्तानवरील हल्ल्यांचे नियोजन आणि समन्वय करण्यात गुंतलेल्या घटकांसाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी लपण्यासाठी केला जात होता.