सज्जनगड किल्ला सातारा

शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : आज रामदास नवमी असून महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदासांचे मार्गदर्शन, विचार, श्रीरामप्रती त्यांची अपार निष्ठा अजून देखील या भारतभूमीतील अनेकांना प्रेरणादायी आहे. समर्थ रामदांसांचे मनाचे श्लोक आज देखील आपल्याला जीवन कसे जगावे हे सांगतात. आज आपण समर्थ रामदास नवमी निमित्त समर्थ रामदास यांच्याशी जोडला गेलेला अद्भुत असा आणि दिव्य, पवित्र, भक्कमपणे उभा असलेले किल्ला पाहणार आहोत. तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात समर्थ रामदासांशी जोडलेला गेलेला किल्ला म्हणजे सज्जनगड होय.  
ALSO READ: संत रामदास अभंग
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हा किल्ल्ला प्राचीन असून एक ऐतिहासिक ठिकाण आहे. जो आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे.  समर्थ रामदास हे अनेकदा या ठिकाणी राहत असत. तसेच त्यांनी सज्जनगडावर एक मठ बांधला होता. समर्थ रामदास हे छत्रपतींचे गुरु होते समर्थ रामदास यांना भेटण्यासाठी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज सज्जनगडावर येत असत. कोणताही मोठा निर्णय असो किंवा अनेक महत्त्वाच्या निर्णयांची प्रेरणा सज्जनगडावर छत्रपतींना रामदासांना भेटल्यानंतर मिळाली.
 
तसेच परळीग्रामजवळील एका टेकडीच्या माथ्यावर सज्जनगड हा किल्ला आहे. तसेच या गडावर समर्थांनी मठ बांधला होता त्या मठामध्ये भगवान श्रीरामाचे मंदिर देखील आहे. तसेच किल्ल्याच्या दक्षिण भागाच्या कोपऱ्यात अंगलाई देवीचे मंदिर आहे. या देवी बद्दल असे सांगण्यात येते की, समर्थांना देवीची मूर्ती अंगापूर नदीतून मिळाली होती. तसेच समर्थानी 'दासबोध' नावाचा एक ग्रंथही लिहिला आहे, जो मराठी भाषेत आहे. तसेच समर्थ रामदासांचे नाव भारतातील ऋषी, संत आणि विद्वान समाजात प्रसिद्ध आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र संत रामदास यांना समर्थ म्हणून देखील ओळखतो तसेच महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात समर्थांची पूजा भगवंत हनुमानाचा अवतार म्हणून केली जाते. तसेच समर्थानी त्यांच्या आयुष्यातील शेष दिवस परळी किल्ल्यावर व्यतीत केले तसेच नंतर या किल्ल्याला सज्जनगड असे नाव देण्यात आले. तसेच माघ वद्य नवमी, शालिवाहन शके १६०३ (इ.स. १६८२) रोजी रामनामाचा जप करीत पद्मासनात बसून त्यांना या गडावर मोक्ष मिळाला. त्यांची समाधी याच सज्जनगड वर आहे. तसेच अनेक समर्थ रामदासांचे भक्त आज देखील मोठ्या संख्यने समर्थांच्या दर्शनाला सज्जनगडावर दाखल होतात. सज्जनगड हा किल्ला अद्भुत असून अनेक पर्यटक देखील गडाला भेट देत असतात.  
ALSO READ: स्फुट अभंग – संत रामदास
सज्जनगडाचा इतिहास 
सज्जनगडाच्या इतिहासाबद्दल जाणून घेतला तर असे सांगतात की प्राचीन काळी या गडावर संत आश्वलायन यांचे वास्तव्य होते व याकरिता या किल्ल्याला आश्वलायन गड असे देखील म्हणतात. तसेच सज्जनगड हा किल्ला 11व्या शतकात शिलाहार राजाने बांधला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी परळी गाव असून  या किल्ल्याला परळीचा किल्ला म्हणतात. या किल्ल्याचा उल्लेख चौथा बहामनी राजा महंमद शाह याच्या प्रदेशात आढळतो. नंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला ज्याने बहामनी राज्याचा काही भाग ताब्यात घेतला. तसेच १६७३ मध्ये सज्जनगड हा किल्ला छत्रपतींनी आदिलशहाकडून जिंकला व छत्रपतींच्या विनंतीला स्वीकार करून समर्थानी सज्जनगडावर कायमस्वरूपी वास्तव्य केले. नंतर १७०० मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला व किल्ल्याला ‘नौरस-सातारा’ नाव देण्यात आले. तसेच १७०९ मध्ये मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला. पण १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
ALSO READ: पिंगळा – संत रामदास
तसेच सज्जनगड किल्ला प्राचीन असून समुद्रसपाटीपासून ९१४ मीटर उंचीवर आहे. तसेच दगडी पायऱ्या या किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातात. गडाला दोन मुख्य प्रवेशद्वार असून हे दरवाजे खूप मोठे व भक्कम  आहे. किल्ल्याचा मैदानाच्या वरच्या बाजूला दोन तलाव दृष्टीस पडतात. तसेच सज्जनगडावर अनेक मंदिरे आहे . व सज्जनगडाच्या मुख्य आणि महत्वाची रचना म्हणजे संत रामदासांची समाधी होय.
ALSO READ: श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत आत्माराम
सज्जनगड किल्ला जावे कसे? 
सज्जनगड किल्ला हा महाराष्ट्रातील प्रमुख शहर सातारा जिल्ह्यात असून १८ किमी अंतरावर आहे सज्जनगड पर्यंत जाण्यासाठी बस, टॅक्सी, रिक्षा यांच्या मदतीने नक्कीच पोहचता येते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती