हिंगोलीतून रुपाली राजेश पाटील, जळगाव शहरातून जयश्री सुनील महाजन, बुलढाणामधून जयश्री शेळके, दिग्रसमधून पवन श्यामलाल जैस्वाल, परतूर मधून आसाराम बोराडे निवडणूक रिंगणात आहेत.
पक्षाने आतापर्यंत एकूण 80 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (UBT) 23 ऑक्टोबर रोजी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानुसार मध्य मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरुण सरदेसाई हे वांद्रे (पूर्व) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.