2 लाखाचा डीडी घेऊन मातोश्रीवर आलेल्या मोहन चव्हाण यांना उद्धव ठाकरे भेटले नाही

बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (15:10 IST)
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना दिलासा दिला असून याचिकाकर्ता मोहन चव्हाण यांना दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच न्यायालयाने 2 लाखाचे डीडी उद्धव ठाकरेंना देण्याचे निर्देश दिले. बंजारा समाजाचे मोहन चव्हाण आज मातोश्रीवर गेले असता उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास नकार दिला. 

बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी मोहन चव्हाण यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 
उद्धव ठाकरे यांना बंजारा समाजाचे महंतांनी विभूती आणि प्रसाद दिला त्यांनी ते घेऊन जवळ भरलेल्या व्यक्तीला दिली. या मुळे ठाकरे यांनी बंजारा समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप केला आणि न्यायालयात याचिका दाखल केली.

यावर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोहन चव्हाण यांना याचिका बिनबुडाची असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल केल्याचे म्हटले. आणि उद्द्भव ठाकरे यांनी कोणत्या प्रकारे धार्मिक भावना दुखावली नाही असे म्हटले. तसेच याचिका दाखल करणारे मोहन चव्हाण यांना 2 लाखांचा दंड ठोठावला असून त्यांना डीडी द्वारे ही रक्कम तीन आठवड्यात उद्धव ठाकरे यांना देण्यास सांगितले. 

आज न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मोहन चव्हाण हे उद्धव ठाकरे यांच्या निवास स्थानी मातोश्रीला 2 लाखांचा डीडी घेऊन आले असता उद्धव ठाकरे यांनी आम्हाला वेळ नाही म्हणत भेटण्यास नकार दिला. 

16 सप्टेंबर रोजी मोहन यांनी शिवसेना भवन कार्यालयाला पत्र लिहून उद्धव ठाकरेंना भेटण्याची वेळ मागितली होती.आणि अर्जात 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 2 ची वेळ मागितली होती. या बाबत शिवसेना कडून पत्र आल्याचे मोहन चव्हाण म्हणाले.डीडी घेऊन आज मातोश्रीवर आल्यावर उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास नकार दिला. 

यावर मोहन चव्हाण म्हणाले, आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार 2 दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या शिवसेना कार्यालयातून ठाकरे यांना भेटण्याची वेळ रीतसर मागितली असून आजची वेळ देण्यात आली असून ठाकरे यांनी भेटण्यास नकार दिला. उद्धव ठाकरे हे कोर्टापेक्षा मोठे झाले आहे का? बंजारा समाजाचे अपमान केल्याने ते समोर कसे जायचे असा विचार करत असणार असं मोहन चव्हाण म्हणाले. 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती