Devendra Fadnavis News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार असून, त्यासाठी आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आज 10 दिवस पूर्ण होत आहे, पण अजून मुख्यमंत्र्यांचा निर्णय झालेला नाही. रविवारी मुख्यमंत्र्यांची बैठक शक्य नसल्याने सोमवारीच निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
तसेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी केवळ देवेंद्र फडणवीस यांचीच उमेदवारी निश्चित आहे. 2 किंवा 3 डिसेंबर रोजी विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात देवेंद्र फडणवीस यांची पक्षनेतेपदी निवड केली जाईल, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेते निवडीसाठी बैठक होणार असून, 6 तारखेपूर्वी शपथविधी जाहीर केला जाईल, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सांगितले. मुनगटीवार म्हणाले, विधीमंडळ पक्षनेते निवडीसाठी बैठक होणार आहे.