शिंदे गटाकडून मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. काल रात्री वर्षावर त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक झाली. यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नावाची लवकर घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान आज वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व येथील कार्यलयात त्यांनी उत्तर पश्चिम मतदार संघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि माजी नगरसेवकांची बैठक घेवून मतदार संघाची चाचपणी केली होती. चर्चेदरम्यान ते त्यांच्या उमेदवारी बद्धल बऱ्यापैकी सकारात्मक होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
वर्षावर 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उत्तर पश्चिम मधील शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि 17 माजी नगरसेवकांची मध्यरात्री बैठक घेतली होती. त्यावेळी सर्वांनी वायकर यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती.