शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध!

गुरूवार, 25 एप्रिल 2024 (14:16 IST)
देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. राष्ट्रवादी प्रमुख नेते शरद पवार यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तसेच या जाहीरनाम्यामध्ये अग्निविर योजनेसोबत महिला आरक्षण बद्दल देखील सांगितले गेले आहे. उद्या 26 एप्रिलला लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु होईल. 
तसेच आता या टप्प्यामधील प्रचार थांबला आहे. तसेच इतर टप्प्यांसाठी मतदान व प्रचार राष्ट्रीय स्तरावर सुरु आहे. आज निवडणुकीसाठीचा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार गटाकडून प्रचलित करण्यात आला आहे. तसेच शरद पवार गटाडून काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश या जाहीरनाम्यात केले आहे. 
 
राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदमध्ये जाहीरनाम्यातील मुद्द्याचा उल्लेख केला. 500 रुपयांपर्यंत गॅसच्या किमती कमी करू तसेच समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, पेट्रोल-डिझेल वरील करांची पुनर्रचना करण्यात येईल. तसेच नोकरीमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा सहभागी आहे. व महिलांना शिक्षणात येणारे अडथळे दूर करण्यात येतील. तसेच विधिमंडळ आणि संसद यांमध्ये महिलांना आरक्षण मिळेल असे प्रयत्न करू. शेती व शिक्षण यांवर जीएसटी माफ करण्यात येईल. शेतकरी वर्गाच्या समस्या दार करण्यासाठी स्वतंत्र अयोग्य स्थापन करण्यात येईल. एससी, एसटी, ओबीसींसाठी खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळेल याचे प्रयत्न करू. असे अजून अनेक मुद्दे शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केले गेले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती