कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेमुळे पीडित मुलाच्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे. ज्याचा परिणाम खूप वेळ पर्यंत राहणार आहे. लहान मुलांच्या मनावर लवकर परिणाम होतो. तसेच अश्या वाईट गोष्टींमुळे लहान मुलांना खूप काही झेलावे लागते. या 8 वर्षाच्या मुलासोबत घडलेल्या या कृत्यामुळे त्याला कदाचित चांगले जीवन जगतांना खूप त्रास होईल.
8 वर्षाच्या या लहान मुलाचे शारीरिक शोषण हा आरोपी करीत होता. या घटनेमुळे पीडित मुलाच्या शरीरावर, मनावर खूप मोठा आघात झाला आहे. कदाचित ही जखम भरून यायला वेळ देखील लागेल. ह्या सर्व बाबी लक्षात घेता मुंबई कोर्टाने या 26 वर्षीय आरोपीला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे.