काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांच्यासह अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

शनिवार, 4 मे 2024 (18:10 IST)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. आम आदमी पार्टीसोबतच्या युतीवरून ते नाराज होते. त्यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लवली यांचीच गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते शीला दीक्षित यांच्या सरकार मध्ये मंत्री होते. लवली यांच्यासह राजकुमार चौहान, नसीबसिंह, नीरज बसोया, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अमित मलिक यांनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला आहे.  
 
अरविंदर सिंग लवली यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, आणि दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

लवली यांनी दिल्ली युनिटच्या अध्यक्षपदाचा अलीकडेच राजीनामा दिला होता. आप शी युती करणे त्यांना काही पटले नाही त्यामुळे त्यांनी राजीनाम्यात देखील म्हटले होते की, दिल्ली काँग्रेस युनिट आप सोबतच्या युतीच्या विरोधात आहे. ज्या पार्टीचे अर्धे कॅबिनेट मंत्री तुरुंगात आहे. काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याच्या आधारावर स्थापिले होते. तरीही दिल्लीत काँग्रेस पक्षाने आपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर काँग्रेसच्या धोरणांची माहिती नसलेल्या दोन नेत्यांना तिकीट देण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी दिल्लीच्या सात ही लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. 
 
Edited By- Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती