सब्यसाची गे पार्टनरचा शोधासाठी रिअ‍ॅलिटी शो

मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (09:20 IST)
सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक शारीरिक संबंध हा गुन्हा नसेल. होमोसेक्शुअ‍ॅलिटी गुन्हा नसल्यामुळे सब्यसाचीचा जाहीरपणे स्वयंवर रचण्याची तयारी सुरू आहे. सब्य का स्वयंवर असे या रिअ‍ॅलिटी शोचे नाव असणार आहे. भारतीय टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या इतिहासात लवकरच अनोखा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
 
सब्यसाचीने सलमान खानच्या बिग बॉस 11 या गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. सब्यसाचीने आपल्या लैंगिक कलाविषयी (सेक्शुअ‍ॅलिटी) यापूर्वीही खुलेआमपणे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्याच्या आत्मविश्वासाला बळकटी आली आहे. राखी सावंत किंवा राहुल महाजन यांच्या स्वयंवराप्रमाणेच सब्यसाचीच्या स्वयंवराचा फॉर्मेट असेल. फक्त सब्यसाची गे पार्टनरचा शोध घेईल, इतकाच फरक असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती