Raebareli: या माकडाला दारूची प्रचंड आवड, न दिल्यास हल्ला करतो

मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (17:55 IST)
दारूच्या व्यसनामुळे माणसांना मारहाण करताना पहिले आहे. परंतु रायबरेली येथे एक माकड दारूसाठी लोकांवर हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ करण्याची धक्कदायक घटना घडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे वृत्त मिळत आहे. दारूसाठी हा माकड लोकांवर हल्ला करतो.माकड ग्राहकांकडून दारू हिसकावून घेते आणि पितात. माकडाने दारू दिली नाही तर माकड लोकांचा चावा घेतो. एका माकडाचा दारू पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.माकडाच्या दहशतीमुळे ग्राहक दारू पिण्यासाठी दुकानात जात नाही.
 
त्यामुळे व्यवसायात नुकसान होत असल्याने माकड पकडण्याची मागणी विभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या दारूबाज माकडाचे चर्चे सर्वत्र होत आहे. दीन शाहगौरा ब्लॉक परिसरातील अचलगंजमध्ये दारूचे दुकान आहे. या परिसरात एक माकड राहतो, जो दुकानात येणाऱ्या ग्राहकांकडून दारू हिसकावून घेतो.
 
दारू विक्रेता ने सांगितले की, या माकडामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेषतः दुकानात येणारे ग्राहक. दुकानात येणाऱ्या ग्राहकांकडून माकड दारू हिसकावून घेते. दिली नाही तर माकड लोकांचा चावा घेऊन त्यांना रक्तबंबाळ करतो. याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. तक्रार आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माकडाला पकडण्याचे आदेश दिले आहे.
 
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती