आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात 'पाहुणा' चित्रपटाला दोन पुरस्कार

मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (15:58 IST)
बॉलिवूडची अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या 'पाहुणा' या चित्रपटाने जर्मनीत झालेल्या स्विंलजल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पखी ए टारवाला यांनी केले असून उत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराबरोबरच ज्युरीचा विशेष पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि तिची आई डॉ. मधू चोप्रा यांनी केली आहे.
 
पर्पल पेबल प्रिचर्स या बॅनरखाली निर्माण करणत आलेल्या या चित्रपटाची कथा लहान मुलांवर आधारित आहे. आई-वडिलांपासून दुरावलेली तीन नेपाळी मुले माओवाद्यांच्या तावडीत सापडतात. परंतु त्यांच्या तावडीतून सुटून ते सिक्कीममध्ये कसे पोहोचतात. हे या चित्रपटात दाखविणत आले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. मधू चोप्रा म्हणाल्या की, आमच्या चित्रपट निर्मिती बॅनरखाली तयार झालेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. सदर चित्रपट गेल्यावर्षी टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती