क्षमा बिंदूच्या लग्नाला विरोध,कोणत्याही मंदिरात लग्न होऊ देणार नाही, माजी उपमहापौर यांची चेतावणी!

शुक्रवार, 3 जून 2022 (20:13 IST)
सध्या बडोदराची क्षमा बिंदू स्वतःशी लग्न करण्याच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे.सोलोगॅमी म्हणजे स्वतःशीचं लग्न करणं. तसा हा ट्रेंड पाश्चिमात्य देशांमध्ये फॉलो केला जातो. जगभरात हा ट्रेंड झपाट्याने वाढत होताच. पण आता तो भारतात ही येऊन पोहोचलाय.
 
11 जूनला भारतात अशाच पध्दतीचा एक विवाह सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण भारत या लग्नाचा साक्षीदार असेल. हा विवाहसोहळा क्षमा बिंदूचा असून 11 जून रोजी गुजरातमधील वडोदरा शहरातील एका मंदिरात हिंदू रितीरिवाजांसह लग्न पार पडेल.
 
लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. या निर्णयानंतर आज सकाळी नगरच्या माजी उपमहापौर सुनीता शुक्ला यांनी हा लग्नाचा विरोध केला आहे. त्या म्हणाल्या की, वडोदरातील कोणत्या मंदिरात मी हे लग्न होऊ देणार नाही. ती एक मानसिक विकृतीची महिला आहे असे उपमहापौरचे म्हणणे आहे. 
 
 क्षमा बिंदूच्या लग्नाला विरोध होत असताना आता क्षमा बिंदूचे लग्न होणार की नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. माजी उपमहापौर यांनी मंदिराच्या विश्वस्तांशी बोलून हे लग्न थांबविण्यास सांगितले आहे. या लग्नाला विरोध असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या समाजात हिंदू शास्त्रात आणि धर्मग्रन्थात आणि वैदिक शास्त्रानुसार लग्न होतात.पण हे लग्न हिंदू शास्त्राच्या आणि वैदिक शास्त्राच्या विरोधात होत असल्याचे त्या म्हणाल्या.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती