मुस्लीम महिलेवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:27 IST)
हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडला. एका मृत मुस्लीम महिलेचे दफन होण्याऐवजी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
लखनऊ येथील सहारा हॉस्पिटलमध्ये विवेख खंड रहिवासी अर्चना गर्ग आणि अलिगंजच्या इशरत जहाँ यांच्यावर न्यूरो सर्जरी विभागात उपचार सुरू होते. या दोघींचाही उपचारादरम्यान 11 फेब्रुवारीला मृत्यू झाला. मृत्यनंतर दोघींचेही मृतदेह शवागारात ठेवण्यात आले. 
 
12 फेब्रुवारी रोजी अर्चना गर्ग यांचे कुटुंबीय त्यांचे शव घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. घरात लग्न समारंभ असल्याने गर्ग यांचे शव थेट स्मशानात न्यायचे होते पण हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना इशरत जहाँ यांचे शव दिले. अर्चना गर्ग यांच्या कुटुंबीयांनी इशरत यांच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले. 
 
नंतर इशरत यांचे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तिथे गोंधळ कळल्यावर हल्ला सुरू झाला. नंतर मौलाना कल्बे सादिक यांच्याशी बोलणे झाल्यावर प्रकरण शांत झाले.
 
यात आश्चर्य म्हणजे अर्चना गर्ग याच्या कुटुंबीयांनी अतिशय घाई-गडबडीत आपण कुणाचे शव घेऊन जात आहोत हे देखील बघितले नाहीत असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे. तरी संयमाने प्रश्न सुटला यात समाधान आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती