आज आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस आहे. या दिवशी आज आम्ही तुम्हाला कॉफी लुवाक या कॉफीची माहिती देणार आहोत. या कॉफीचा एक कप अमेरिकेत सुमारे १२० डॉलरपर्यंत मिळतो. भारतीय चलनात याची किंमत मोजायची असेल तर एक कप कॉफिसाठी तुम्हाला ५ ते ६ हजार रुपये मोजावे लागतील. दक्षिण भारतात कर्नाटक राज्यात या कॉफीचे उत्पन्न घेतले जाते.
या कॉफीचे वैशिष्ट्य म्हणजे सिव्हेट नावाच्या मांजराच्या विष्ठेपासून ही कॉफी तयार केली जाते. या मांजराची शेपटी लांब असते. विशेष म्हणजे या मांजराला कॉफीची फळं खुप आवडतात. कच्ची असतानाच हे मांजर कॉफीची कच्ची फळं खातं. या फळाचा गर मांजराला खाता येतो. पण कॉफिचं संपूर्ण फळं पचवणं या मांजराला शक्य नसतं. त्यामुळे न पचलेलं फळ मांजराच्या विष्ठेतून बाहेर येतं. याचाच वापर कॉफी तयार करण्यासाठी केला जातो.