पिठावर थुंकुन पोळ्या बनवत होता... व्हिडिओ व्हायरल, ढाबा मालकासह सहा जणांना अटक

Webdunia
बुधवार, 12 जानेवारी 2022 (11:42 IST)
लखनऊच्या काकोरी भागात थुंक लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपी तरुणासह 6 जणांना अटक केली. काकोरी परिसरातील अली हॉटेलमध्ये पिठावर थुंकून तंदुरी पोळ्या बनवल्या जात होती, याचा व्हिडिओ एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कारागीर चुलीवर उभा आहे आणि हाताने रोटी बनवत आहे आणि तंदूरमध्ये ठेवण्यापूर्वी तो रोटीवर थुंकताना दिसत आहे.
ALSO READ: लस घेताच बोलू लागला
अलीकडेच काकोरीच्या अली ढाब्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या 22 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तंदूरमध्ये रोटी टाकणारी व्यक्ती कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत होते. तंदूरमध्ये रोटी टाकण्यापूर्वी तो पीठात थुंकत आहे. काकोरीचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ढाबा मालक, पोळ्या बनवणारा, स्वयंपाकी यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. ढाबा मालक याकूब, हेल्पर दानिश, हाफिज, मुख्तार, फिरोज आणि अन्वर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 

संबंधित माहिती

पुढील लेख