Nagpur News:गोलगप्पा, पाणीपुरी, पुचका... तुम्ही त्यांना काहीही म्हणा, मसालेदार पाणी आणि चविष्ट पदार्थांनी भरलेले हे कुरकुरीत पदार्थ प्रत्येकाला आवडणारे आहे.पाणीपुरीचे नाव जरी आले तरी तोंडाला पाणी येत. पाणीपुरी सध्या रस्त्यावरील गाळापासून ते पंचतारांकित हॉटेल्स मध्ये उपलब्ध आहे. लग्नसमारंभ मध्ये देखील पाणीपुरी आवर्जून ठेवली जाते. महिला, वृद्ध आबाळ , मुले पाणीपुरी खाण्याचा आस्वाद घेतात. पाणीपुरीच्या दुकानात नेहमीच गर्दी दिसते.
पाणीपुरीची आवड ठेवणाऱ्या खवय्यांसाठी नागपुरातील एका पाणीपुरी विक्रेताने दुकानावर येणाऱ्या ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. या विक्रेताने दुकानावर एक पोस्टर लावले आहे. त्यात लिहिले आहे की, एकाच वेळी 151 पाणीपुरी खाणाऱ्यांना रुपये 21 हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार.विजय मेवालाल गुप्ता असे या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे.
विक्रेताने ग्राहकांना साप्ताहिक, मासिक, वार्षिक आणि आजीवन मोफत पाणीपुरी खाण्याचा ऑफर दिला आहे. त्यामध्ये ग्राहकाला आठवडाभर पाणीपुरी खायची असल्यास त्याला 600 रुपये भरावे लागतील. जर एखाद्या ग्राहकाला दरमहा पाणीपुरी खायची असेल तर त्याला या साठी पाच हजार रुपये मोजावे लागतील.सहा महिन्या पर्यंत खायची असेल तर 30 हजार रुपये भरावे लागणार.
माध्यमांना सांगतांना विजय म्हणाले, आमच्याकडे 1 रुपयांपासून ते 99 हजार पर्यंतचे ऑफर आहे. विक्रेत्याने 99 हजार रुपयांच्या एकाच पेमेंटवर आयुष्यभर गोलगप्पा देण्याची ऑफर दिली आहे. या करारानुसार, ग्राहक सुरुवातीच्या गुंतवणुकीनंतर कधीही स्टॉलला भेट देऊ शकतात आणि मोफत गोलगप्पांचा आस्वाद घेऊ शकतात.