▪️ दूरचे लग्न कार्य, अनावश्यक कार्यक्रमात जाणे टाळावे
▪️ अनावश्यक प्रवास कमीतकमी 1 वर्ष टाळावा
▪️ कोणतेही गर्दीचे ठिकाण नेहमीसाठीच टाळणे तर आरोग्यासाठी योग्य ठरेल.
▪️ आजारी व्यक्तीच्या भेटीला जाणे टाळावे
▪️ सर्दी-खोकला असणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहावे, अश्या व्यक्ती घरातच असेल तर, त्याने वापरलेल्या वस्तू निर्जंतुक करण्यावर जास्त भर द्यावा
▪️ कमीतकमी 1 वर्ष तरी घराबाहेर जाताना मास्क वापरावा
▪️ जास्तीत जास्त शाकाहार करावा
▪️ येणारे 6 महिने पुढील गोष्टी निश्चय पूर्वक टाळाव्या - सिनेमा थिएटर, शॉपिंग मॉल, बगीचा, वॉटर पार्क, संग्रहालय भेटी, पार्टी, अनावश्यक मेळावा, सभा
▪️ स्वतःची व परिवाराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असेच वर्तन ठेवावे (खाद्य, व्यायाम)
▪️ सलून / पार्लर मध्ये जाताना विशेष काळजी घ्यावी
▪️ सामाजिक अंतरचे नेहमीच भान ठेवावे व जागरूक राहावे
▪️ शक्यतोवर बेल्ट, अंगठी, दागिने, घड्याळ, कडे, अंगावर धातूच्या इतर गोष्टी 1 वर्ष तरी टाळाव्या
▪️ बाहेरून आल्यावर हात व पाय स्वच्छ धुणे
▪️ एखाद्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास गरम पाण्याने स्नान करणे