बाळांची नावं करोना आणि लॉकडाऊन

गुरूवार, 2 एप्रिल 2020 (11:49 IST)
जगभरात करोना व्हायरस पसरत आहे आणि या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशात सुरक्षेच्या दृष्टीने भारतात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे टीव्ही असो वा सोशल मीडिया सर्वीकडे करोना, कोविड आणि लॉकडाऊन हेच शब्द ऐकायला मिळत आहे. परंतू असे नाव नवजातला देण्याचा विचित्र प्रकार देखील दिसून आला आहे. 
 
उत्तरप्रदेशातील दोन कुटुंबांनी चक्क बाळांची नावं करोना आणि लॉकडाऊन अशी ठेवली आहेत. 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यादिवशी उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये एका मुलीचा जन्म झाला होता. त्यामुलीचे नाव करोना ठेवलं आहे. नुकताच देवरिया जिल्ह्यात एका बाळाचा जन्म झाला. त्याचे नामकरण कुटूंबीयांनी लॉकडाऊन असे ठेवले आहे.
 
तसेच छत्तीसगढच्या रायपूरला 27 मार्च रोजी जन्मला आलेल्या जुळ्यांची नावं करोना आणि कोविड अशी ठेवली आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती