महिलेच्या पतीने दिलेल्लया माहितीनुसार 29 मार्च रोजी त्याच्या पत्नीची प्रसुती झाली. नंतर पत्नीला आणि तान्ह्या बाळाला एका प्रायव्हेट खोलीत हलवण्यात आलं. नंतर दोन तासाने पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितले. 24 तासांनंतर डॉक्टरांनी फोनवर सांगितले की ऐआम्हाला ज्या खोलीत हलवण्यात आलं होती ती खोली करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसंच त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर तपासण्यासाठी येणार नाही.