मुंबईतील वरळी कोळीवाडा सील, 5 हून अधिक कोरोना संशयित रुग्ण

सोमवार, 30 मार्च 2020 (16:57 IST)
मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे 5 हून अधिक कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाडा सील करण्यात आला आहे. मागील 2 दिवसात त्यांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह पोलिस प्रशासन हायअलर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोळीवाड्यात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुणाला बाहेरही येऊ दिले जात नाही. या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी देखील युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे.
 
त्यानंतर सोमवारी वरळीतील कोळीवाडा इथे संशयित रुग्णांचा आकडा वाढला. त्यामुळे आधीच बंद केलेल्या कोळीवाड्यात आणखी खबरदारी घेण्यात आली. कोळीवाड हा प्रचंड दाटीवाटीने लोकवस्ती असलेला परिसर आहे. येथे बैठ्या चाळीत नागरिक राहतात. त्यामुळे येथे कोरोनाचा संसर्ग झाल्यास मुंबईवरील कोरोनाचा धोका अनेक पटीने वाढणार आहे. हाच धोका लक्षात घेऊन कोरोना संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनासह इतर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती