राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा आज १२ ने वाढला. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. आज ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यामध्ये ६ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्ती आहेत. सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंतेचं वातावरण आहे. तर नागपुरात ही आज नवे ५ रुग्ण आढळले आहेत.