कोरोनापासून बचावलेले १० टक्के रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित

शुक्रवार, 27 मार्च 2020 (07:36 IST)
चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. आता संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान माजवले आहे. चीनमध्ये बाधितांची संख्या कमी होत असून जगभरातील बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. मात्र चीनमध्ये ७८ हजार लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर आता ५ हजार रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. पण आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय ती म्हणजे कोरोनावर मात केल्यानंतर १० टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.
 
दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वुहानमधील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना कोरोना पुन्हा होत असल्याचे आढळले आहे. मात्र यामागचे कारण डॉक्टरांना अद्याप सापडलेलं नाही. कोरोनावर मात करण्यासाठी जी औषधे वापरली जात आहे, त्यांचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा हा व्हायरस विकसित होत असावा. त्यामुळं आता चीनसमोर एक वेगळेच आव्हान आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती