सोशल मीडियावर तुम्ही वधू-वरांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यापैकी अनेक व्हिडिओ भावुक असतील तर काही फनी. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर एकमेकांशी भांडत आहेत. व्हिडिओ पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत तर काही मजेशीर कमेंटही करत आहेत.
व्हिडिओमध्ये वधू-वर लग्नाच्या पोशाखात स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. नंतर स्थिती इतकी बिघडली की दोघांमध्ये हाणामारी सुरू होते. दोघांमधील भांडण पाहून लोक हैराण झालेले दिसत आहेत. पाहुणे वधू-वरांमधील भांडण शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे मात्र ते भांडत राहतात.
एका युजरने कमेंट केली की, वधू-वरांच्या कुंडली जुळलेल्या पंडितांना कॉल करा. तर एका यूजरने लिहिले की, लग्नाची इतकी जोरदार सुरुवात तर पुढे काय काय. एकाने लिहिले की वधू-वरांचे 36 पैकी 36 गुण आढळून येत आहेत.